आशावाद..

जगणं छान आहे म्हणत म्हणत जगण्याला अश्व लागायची वेळ आपल्यावर येऊन ठेपते हे बऱ्याचदा जगण्याचा महोत्सव करावा याची अक्कल आलेल्या वयातही कळत नाही. त्यावेळेस करावं काय आणि काय करायला पाहिजे हे काय करत होतो याकडे पाहून सुचतं. बऱ्याचदा जे करत होतो तेच पुन्हा नव्याने करण्याची गरज आहे किंवा नवीन करतांना जे करत होतो ते न करता नव्याने नवीन करायचं आहे हे सुचून जातं. कुणाचीच वेळ गेलेली नसते. त्या त्या वेळेचं गांभीर्य ओळखून त्या त्या क्षणाला करावयाच्या गोष्टींना प्राधान्य देता आलं पाहिजे. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींमधून आपण फुसकी प्रेरणा घेत असतो पण वैध स्वप्नांइतकं स्वतःला पेटवत ठेवण्याचं सामर्थ्य अजूनतरी मला कशात सापडलं नाही. ते बारकुले असोत की मोठे पण खरंच स्वप्न बघावेत माणसानं. मसणवट्यात जायची वेळ आली तरी छाती फुटसतोवर मेहनत करण्याचं बळ देणारा आपल्यात आशावाद जिवंत असला की स्वतःच्या कर्तेपणावर शंका येत नाही. तो  कर्तेपणा फक्त तसा जिवंत असून उपयोग नाही त्याला चौफेर हालचालींची जोड असली म्हणजे वेल मांडवाला गेल्याशिवाय राहात नाही.  रडत सगळेच असतात आपापल्या कमीपणाकडं बघून, झिजून जाताना उत्साहानं मिरवता आलं पाहिजे. आयुष्य सुंदराय.. त्याला अजून सुंदर बनवता येऊ शकतं!

~ माऊली
२४.०६.२०

Comments

Popular posts from this blog

#यादें.. भाग-३

सोचो, खुश रहो..

#यादें.. भाग-२