आठवणींचे मनोरे
"हो.. मी सांगितलं ना तुला, आले फक्त पाचच मिनिटात.." ती वेणीत गुंतलेले केस मोकळे करत करत त्याला आश्वासन देत होती.. त्यालाही माहीत होतं ती आता त्याला पाच मिनिटांचा दुरावा देऊन कुठं चालली आहे ते. करण हे फक्त आजच्यापुरतंच मर्यादित नव्हतं त्यांच्या जोडीच्या सहवासाला आता जवळ-जवळ दोन वर्ष होत आली होती. म्हणजे परस्परांच्या सवयी बऱ्यापैकी माहीत होत्या एकमेकांना. रोज रात्री ती या वेळेला त्याच्याकडून हक्काने पाच मिनिटं मागून घ्यायची आणि अंघोळ करून यायची. हो ती रोज रात्री झोपण्यापूर्वी अंघोळ करायची. त्यानं या वेळेला अंघोळ करण्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी तिला बऱ्याचदा लाडीगोडी लाऊन झालेलं पण तिने नव्हतं त्याला कळू दिलं.. पण तोही बिचारा हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. त्याला हे जाणून घेण्यापायी का अजून काय माहिती नाही पण रोज निदा फ़ाज़लींचा एक शेर या वेळी नक्की आठवायचा.. "हर इक आदमी में होतें हैं दसबीस आदमी, जब भी मिलोगे हर इक से मिलना.." आणि पुन्हा तो तिला अंघोळीसोबतच बऱ्याच गोष्टी बोलत्या करण्यासाठी चवताळून उठायचा. पण पुरुषांच्या अशा वागण्याला हॅलो देईल ती बाईची जात कसली?.. म्हणज...