Posts

Showing posts with the label #zindagi gujar hain.. ❤️

#आठवणींचे मनोरे..

वेळ काळाइतकं कुणीच कठोर नसतं. आजकाल ही गोष्ट जरा जास्तच तीव्रतेनं कळायला लागलीय. तुला जाऊन  कालपरवा २ वर्ष उलटून गेली. अजूनही काळजावरच्या सुरकुत्या तुझा चेहरा आठवला की सर्रssकन् निघून जातात. आणि मी पुन्हा त्याच विचारांत गुरफटून जातो की असं काय आहे तुझ्या आठवणींत? ज्यामुळं माझ्यातला एकदम ढालाढिला माणूस पूर्ण उत्साहात येऊन तुझ्यातच विरून जातो. विचार थांबत नसतात माणसाचे, वावटळीत उडालेल्या पाचोळ्यागत ते कुठवरही धावतच राहतात म्हणून मी सतत आवरायचा प्रयत्न करतो तुझ्या बाबतीत येणाऱ्या विचारांना. पण होतं एकदम उलटंच. मी करत असलेला थांबवायचा केविलवाणा प्रयत्न गुरफटून जातो पुन्हा येणाऱ्या आठवांच्या वादळात. अशा वेळी कसं जगावं माणसानं? नको नको म्हणून दाबून धरायचा प्रयत्न केल्यावर एकदम उसळीच येते त्यांना.  तुझ्या जाण्यानं मला एक गोष्ट अजून नकळत उमगून गेली. रात्रीवर प्रेम करावं माणसानं. हीच ती. शब्द, आवाज, दृश्य, वेळ, निसर्ग, कल्पना, हे सगळं बोलू लागतात आपल्यासोबत रात्रींत. आणि एकंदरीतच आयुष्य म्हणजे इंद्रधनू अन तसलं औघड असं काही नसून मोकळ्या हवेत तुझ्या हातात हात घालून बसावं बस एवढीच अपेक्षा...