Posts

Showing posts from 2021

Hopes..

वर्ष वाया जात असतं आयुष्य नाही. एका चुकीच्या निर्णयामुळे आयुष्य संपत नाही. खुप काही करण्यासारखं असतं. त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. काही गोष्टी उशिरा जगायला चालू होतील आयुष्यात. त्यानं एवढा फरक पडत नसतो. शेवटी समाधानानं जगणं आणि स्वतःवर प्रेम करत राहणं महत्वाचं. २२.०५.२०

स्वतःबद्दल..

स्वतःबद्दल..! स्वतःच मन मारणं आणि आपल्या मनाच्या विरोधात  आपण स्वतःसोबत तडजोड करत आहोत अशी गोष्ट करणं हे जगात सगळ्यात जास्त वाईट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. माझ्याबद्दल दोन शब्द लिहायचे, बोलायचे किंवा कुणी माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास तिथलं जजमेंट हे कदाचित दुनियेला मी कसा पाहिजे हे अपेक्षित करून असेल पण माझ्या मनात मी वर उल्लेखलेली गोष्ट तंतोतंत पाळणारा किंवा ती गोष्ट माझ्यात भिनलेला माणूस आहे असं मला वाटतं. एखादी गोष्ट स्वतःला पटली असेल तरच तिचा हव्यास आपल्याला असावा, ती गरजेची आहे म्हणून तिचा माग करणं कधीच जमलं नाही. विशेषणांच्या भाषेत बोलायचं झाल्यास संयम कमी आणि गरम डोक्याचा जास्त पण जबरदस्ती संयम पाळणारा, खूप जास्त आळशी, [माझं नेहमी असं म्हणणं आहे की मला संभाळायला एक माणूस लागतो. मी स्वतःची अजिबात काळजी घेत नाही. कुठलीही गोष्ट करायला लावावी लागते तेंव्हा ते मी करतो. (पण मला याची लाज पण वाटत नाही. काय माहिती 😜) ], थोडाच हार्डवर्कर, माणसं जोडणारा, प्रचंड आशावादी, जबरदस्ती व्यायाम पण आवडीने झोपा काढणारा, भारतीय शास्त्रीय संगीत, पाकिस्तानी कव्वाली-गझल, उर्दू-हिंदी शायरी तसे...

"रात्रंदिनं आम्हां युद्धाचा प्रसंग.."

"रात्रंदीनं आम्हां युद्धाचा प्रसंग.."                                   - संत तुकाराम आपण रोजच्या जगण्यात जर उघडे डोळे ठेऊन वावरत असलो तर बऱ्याच गोष्टी आपल्याला खटकतात किंवा याची जाणीव होऊन जाते की काहीतरी वेगळं म्हणजे जसं घडायला पाहिजे होतं तसं न घडता वेगळं काहीतरी घडतंय जे अपेक्षित किंवा सगळ्यांच्या सोयीचं नाही. माझं गाव सुद्धा याला अपवाद नाही. जे डोळ्याला दिसेल तिथं काम करायला वाव आहे. ते फक्त सरकारी यंत्रणेनंच केलं पाहिजे असा आपला हट्ट असेल तर मला वाटतंय आपण मागच्या दिशेने प्रवास करतोय. आपल्याला दिसतंय, आपण करू शकतोय आणि आणि केल्यानंतरचे परिणाम हे 'चांगले' असणार आहेत तर ते तुम्हाला शक्य होईल तितकं तुम्ही केलं पाहिजे. यात सामाजिक जाणिव, देणं लागतो वगैरे फुसके वाक्य बोलून काही पदरी पडणार नाही. जे होईल ते आपल्याच सोयीचं होणार आहे फक्त एवढया अपेक्षेने केलं तरी काही न काही होऊन जाईल. लॉकडाऊन मूळ कामं धंदे सोडून गावी घरी बस...

दादा..

हा जन्म मिळाल्याचा सर्वात मोठा आनंद कोणता माहितीये..  तुझ्यासारखा माणूस मोठा भाऊ म्हणून लाभला!  ❤️🙏

असंच काहितरी..

प्रतिशोधाची भावना विवेकास हरवते. शांतता-संयम जिंदाबाद!