स्वतःबद्दल..! स्वतःच मन मारणं आणि आपल्या मनाच्या विरोधात आपण स्वतःसोबत तडजोड करत आहोत अशी गोष्ट करणं हे जगात सगळ्यात जास्त वाईट आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. माझ्याबद्दल दोन शब्द लिहायचे, बोलायचे किंवा कुणी माझ्याबद्दल बोलायचं झाल्यास तिथलं जजमेंट हे कदाचित दुनियेला मी कसा पाहिजे हे अपेक्षित करून असेल पण माझ्या मनात मी वर उल्लेखलेली गोष्ट तंतोतंत पाळणारा किंवा ती गोष्ट माझ्यात भिनलेला माणूस आहे असं मला वाटतं. एखादी गोष्ट स्वतःला पटली असेल तरच तिचा हव्यास आपल्याला असावा, ती गरजेची आहे म्हणून तिचा माग करणं कधीच जमलं नाही. विशेषणांच्या भाषेत बोलायचं झाल्यास संयम कमी आणि गरम डोक्याचा जास्त पण जबरदस्ती संयम पाळणारा, खूप जास्त आळशी, [माझं नेहमी असं म्हणणं आहे की मला संभाळायला एक माणूस लागतो. मी स्वतःची अजिबात काळजी घेत नाही. कुठलीही गोष्ट करायला लावावी लागते तेंव्हा ते मी करतो. (पण मला याची लाज पण वाटत नाही. काय माहिती 😜) ], थोडाच हार्डवर्कर, माणसं जोडणारा, प्रचंड आशावादी, जबरदस्ती व्यायाम पण आवडीने झोपा काढणारा, भारतीय शास्त्रीय संगीत, पाकिस्तानी कव्वाली-गझल, उर्दू-हिंदी शायरी तसे...